काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मागच्या निवडणुकांमध्ये जे झालं ते विसरून पुढे वाटचाल करण्यासंदर्भात आवाहन केलं होत. नुकतीच राज ठाकरेंची विभाग अध्यक्ष्यांसोबत बैठक पार पडली. त्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात व्यापक चर्चा झाली असल्याचे समजल. त्यासोबत लवकरच येत्या काही दिवसात पक्षात पूर्ण रिफॉर्म करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला असल्याचे देखील समजले.
आता हा बदल नक्की कसा असेल? हे येत्या काही दिवसात समजेलच. पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसे पक्षाच्या निवडणूक चिन्हाला घेऊन जी चर्चा सुरु होती, कि रेल्वे इंजिन हे मनसे पक्षाचे जे निवडणुकीचे चिन्ह आहे ते जाऊ शकते हि चर्चा कुठेतरी फुलस्टॉप घेताना दिसतेय. कारण या बैठकीत नव्याने पक्ष कसा उभारता येईल आणि पक्ष लोकांपर्यंत कसा पोहचेल याची काही स्ट्रॅटर्जी राज ठरेना आखल्याचे समजतेय.
चर्चा तर अशी हि रंगली होती कि कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील आणि एकत्र येऊन निवडणूक लढतील… त्याच सोबत अशी हि चर्चा होताना दिसतेय कि कदाचित शिवसेना शिंदे पक्ष आणि मनसे हे एकत्र येतील आणि अजून एक चर्चा अशी होतेय कि भाजप आणि मनसे हे युती करतील.पण अखेर शेवटी या सर्व चर्चा आहेत. हे किती खरं आणि किती खोट या चर्चांच्या पडद्यावर महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा आल्यावर प्रकाश पडेलच. पण हे चित्र तर सध्या स्पष्ट आहे कि मनसे पक्षाचं चिन्ह कुठेहि जात नाही आहे.
येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसे कशाप्रकारे स्वतःचं कम बॅक करेल? आणि कोणती रणनीती महानगरपालिका निवडणुकीत आखेल आता याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सोबतच मराठी माणसांसाठी नेहमी आवाज उठवणारे आणि त्यांच्या समस्यांवर लढत असणारे राज ठाकरे ज्यांच्या सभा ऐकण्यासाठी जो हजारोंच्या संख्येने जण समुदाय येतो तो यावेळी तरी राज ठाकरेंना आणि मनसे पक्षाला निवडणुकीच्या रिंगणात पाठिंबा देईल? कि जे चित्र विधानसभा निवडणुकीत मनसे पक्षाचे दिसले तेच चित्र महानगरपालिका निवडणुकीत देखील दिसेल हे पाहणं महत्वाचे ठरेल.
यासंपूर्ण गोष्टीवर तुमचं काय मत आहे ते कंमेंट करून नक्की कळवा.

Comments
Post a Comment