माणसातील माणूसकी....

                       माणसातील माणूसकी

          नेहमी प्रमाणे सकाळ सुरू झाली होती. रोजच्याच रेल्वेने प्रवास हि सुरू होता. दोन स्टेशन उलटून गेले आणि वांद्रे स्टेशनला गर्दीच्या घोळक्यात मळकट साडी नेसलेली, केस विसकटलेली, फाटलेलं ब्लाऊज घातलेली, अंगाने बारीक, डोळ्यात दु:खाचे अश्रू साठवलेली, सुकलेल्या चेहऱ्याची पायाने अधू असलेली एक साधारण ६०-७० वर्षाची एक म्हातारी आपला अधू पाय सरकवत सरकवत डब्यात चढली. रेल्वे डब्यात चढल्यावर दोन सेकंद थांबून तिने श्वास घेतला. ती दरवाज्यातून आत येऊन पुढे सरकली आणि लोकांकडे दयेचा हात तिने पसरवला. काहींनी तिला बघून तोंड वाकड केलं तर काही नाकाला रूमाल लावत होत्या. तिला कोणीचं मदत करत नव्हतं. तिचा कळवळलेला चेहरा बघून मला खूप वाईट वाटलं. मी लगेचच माझ्या खिशात हात घालून १० रूपयांची नोट तिच्या हातावर ठेवली. ती १० रूपयांची नोट हातावर पाहून तिच्या डोळ्यात पाणी साठलं आणि ती म्हणाली की, "देव तुझ भलं करो अनं तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण होऊन दे पोरी" ऐवढं बोलून ती पुढे सरकली. नंतर ती दरवाज्यात जाऊन बसली. आजूबाजूच्या बायका तिच्याकडे नुसत्या बघत होत्या. तिच्या कडे बघून मी तिच्या परिस्थितीचा अंदाज लावला. कदाचित तिला तिच्या मुलाबाळांनी घरातून हकलवलं होतं. माझा स्वत:शीच संवाद सुरू होता. तेवढ्यात विले पार्ले स्टेशन आलं आणि मी उतरली. नंतर नेहमी प्रमाणे काँलेजला गेली. त्याच दिवशी दुपारी घरी जात असताना स्टेशनवर एक म्हातारा वेदनेने कळवळताना दिसला. नंतर तिथल्या पोलिसांनी त्याला उचलून हाँस्पिटलला नेले. अचानक हा प्रसंग बघून सकाळी पाहीलेल्या त्या म्हाताऱ्या बाईचा चेहरा आठवला. खरचं लोक इतके स्वार्थी झाले आहेत? की जिने ९ महिने आपल्याला पोटात वाढवलं प्रसुतीच्या कळा सहन करून आपल्याला जन्म दिला. ज्याने आपलं भविष्य चांगल व्हावं यासाठी दिवस रात्र कष्ट करून आपल्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या अशा आई-बापाला रस्त्यावर सोडलं...


          'आईबाप' हि देवाने दिलेली अशी देण आहे जी पैशाने मिळत नाही. आईबाप हे आपल्या मुलांसाठी अतोनात कष्ट करत असतात. आपल्याला जे मिळालं नाही ते सर्व आपल्या मुलांना मिळाव यासाठी ते झटत असतात. आपल्या मुलांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी यासाठी त्यांची धडपड सुरू असते. आपण आजारी पडलो की दिवसरात्र आपल्या उशाशी बसून आपली काळजी घेत असतात. आपल्याला लागल की त्यांच्या डोळ्यात पाणी येत. आपल्या यशात आणि अपयशात ह्या दोनच व्यक्ती आपल्या पाठीशी खंबीर उभ्या असतात. आपल्या चुकीवर रागवणारे, ओरडणारे आणि आपल्याला मायेने समजवणारे हे आपले आई-बाबाचं असतात. त्यांच्या प्रत्येक कष्टामागे आपल्या भविष्याची चिंता दडलेली असते. भरकटलेल्या वाटेवर बोट धरून वाट दाखवणारे हे आपले आई-बाबाचं असतात. पण मुलं मोठी झाली की ह्याच वाट दाखवणाऱ्या दोन व्यक्तींना वाटेवर सोडतात. लग्न झाल्यावर आई-बाबा हे मुलांना ओझ वाटतात. पण त्यांचं लग्न यशस्वी होण्यासाठी हेच आई-बाबा धडपड आणि मेहनत करत असतात. बोलायला, चालायला, स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवणाऱ्या आई बाबाला मोठ झाल्यावर तिच मुलं बाहेरचा रस्ता दाखवतात. त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडतात. पण खरचं माणसातली माणूसकी इतकी संपलेय की ज्यांनी आपल्यासाठी दिवसरात्र एक करून आपल्याला वाढवलं, शिकवलं, आपल्या यशासाठी नकळत प्रयत्न केले त्यांना आपण विसरत आहोत???


           आई-वडिल हे असे आदर्श आहेत जे स्वत:च्या इच्छा, आशा-आकांक्षा बाजूला ठेऊन मुलांचे स्नप्न पूर्ण करणारे अंत:करण असते. आई-वडिल हे असे व्यक्तिमत्व असते जे जन्मापासून मरेपर्यंत आपल्यावर प्रेम करत असतात. यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण उंच झेप घेतो तेव्हा जमिनीवर दोन डोळे आतूरतेने आपली वाट बघत असतात. ते म्हणजे आपले आई आणि बाबा... तुमच्या प्रत्येक दिवसात  त्यांनी त्यांचं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरणपर्यंत त्यांनी त्यांचं आयुष्य खचलेलं असतं... ह्या जगात आपलं मन हे "आई" आणि आपलं उज्वल भविष्य ओळखणारे हे "बाबा" असे एकमेव जोतिष असतात. 
        आई वडिलांवर प्रेम करा, त्यांचा आदर करा, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या सर्व कष्टांची जाणीव ठेवा. आपण मोठे होण्याच्या नादात हे विसरून बसलोय की ते हि म्हातारे होत चाललेत. हि भावना जेव्हा प्रत्येक मुलाच्या मनात रूजलेली असेल तेव्हा वृद्धाश्रमांमध्ये एक ही म्हातारे आई वडिल आपल्याला दिसणार नाही किंवा कोणत्या रेल्वे स्टेशन वर, रेल्वेच्या डब्यात कळवळलेल्या नजरेने भिक मागणारे आई वडिल दिसणार नाहीत.... 
    

       😇आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला कधी विसरायचं नसतं, 😇 🙏"आई वडिलांचे" ऋण फेडल्या शिवाय मरणाचं नाव सुद्धा घेयचं नसतं..🙏        
   

                                      - सायली चाळके.

Tags:-
#Mother# #Father# #parents# #truestory# #feelings# #Beggars# #life# #God# #money#



Comments

  1. खूपच छान लिहलयस सायली👌👌👌

    ReplyDelete
  2. मस्तच सायली...😘आई वडील हे आपले देव आहेत.आणि त्यांची जागा कोणीच नाही घेऊ शकत.

    ReplyDelete
  3. खरंच आहे. माणसातली माणुसकी संपते. आपलेचं लोक परके कधी होतात समजत नाही.

    ReplyDelete

Post a Comment