नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही….

 


“देवाची करणी आणि नारळात पाणी” हि म्हण लहानपणी ऐकली होती पण त्याचा खरा अर्थ आता समजतो. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा उगाचच आलेला नसतो. त्याच्या येण्या आणि जाण्या मागे काही ना काही कारण नक्कीच असते. आणि हि क्रिया तो वर बसलेला विश्वरचेताचं घडवत असतो. कुणाशी काही तरी ऋणानुबंध जुळलेले असतात. नाही तर एवढ्या करोडोच्या लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तीशी आपली ओळख का होते? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही... 

रक्ताच्या नात्यांना ऑपशन नसतात ती मरे पर्यंत जपावीच लागतात निभवावीच लागतात परंतु सहज झालेली आपुलकीची नाती हि जबरदस्तीने नव्हे तर मनाने जोडली जातात. त्यात काही बंधने नसतात ती आपोआपच जोडली जातात. आणि हीच व्यक्ती आपल्या आयुष्यातला प्राणवायू हि बनतात.  यातले relation हे mutual relation असतात. यात मन जुळली कि आपोआपच सर्व काही जुळून येते. त्यांच्याशी बोलण्याची आणि त्यांच्या सहवासाची इतकी सवय झालेली असते कि त्यांनी आपली दखल घेतली नाही कि नकळतच आपले मन दुखावले जाते. आपल्या bad patch मध्ये त्यांनी आपल्यासोबत असणंच आपल्यासाठी सर्व काही असत. "तू टेन्शन नको घेऊ मी आहे ना" हे एवढंच वाक्य त्यांच्याकडून आपण अपेक्षित करतो. "मी आहे ना" एवढे शब्द संजीवनीसारखे काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षपणे त्यांचं असणं सकारात्मक ऊर्जा देऊन जातं. पैशाने श्रीमान होणे सोपे आहे काही ना काही मार्गाने ते होऊ पण नात्याने समृद्ध होणे तितकेच कठीण आहे. त्यामुळे पैशांचा गर्व असावा पण तो गर्व माणसावर हावी होईल याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. आताचे युग हे पैशाला जास्त महत्व देत पण लक्षात ठेवा मरणानंतर चिते परेत पोहचवणासाठी हि जोडलेली माणसचं येतात.... 

नटसम्राट चित्रपटात एक गाणं आहे. “नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही” . हे गाणं खरचं मनाला स्पर्श करतं आणि जीवनात आलेल्या अनोळखी पण जवळच्या वाटणाऱ्या लोकांना मानाशी घट्ट करून जातं…


Comments