महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं कि ‘गुंता सुटता सुटेना’ अशीच काहीशी गत पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नुकत्याच उरकल्या आहेत आणि या निवडणुकीच्या निकालात महायुतीने बाजी मारत २८८ जागांपैकी तब्बल २३० जागांवर विजय मिळवत महाराष्ट्रात आपलं सरकार स्थापन केलं आहे. तर महाविकास आघाडीने केवळ ४६ जागांवरती विजय मिळवला आहे. महायुतीच्या या विजयानंतर खरं तर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येणं अपेक्षित होत परंतु अजून हि तो चेहरा निश्चित होत नसल्याचे चित्र आज झालेल्या प्रेस कॉन्फेरंस मधून सिद्ध झालं.
२६ नोव्हेंबर ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा कार्यकाळ संपला आणि त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्त केला. तर शपथविधी पर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांनी एकनाथ शिंदे याना सूचना देखील दिली. एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर येऊ लागल्या. तर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणीं आणि कार्यकर्त्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या कि एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे. हे सर्व घडत असताना एका घटनेची पुनरावृति होत कि काय असाच वाटू लागलं. ती घटना कोणती? आता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ती घटना म्हणजे महाराष्ट्रात पण कुठे तरी मध्यप्रदेश पॅटर्न लागू होतंय.
मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात पण राजकीय भूकंप होणं, एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपदी बसणं, निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीचं महिलांना टार्गेट करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणणं आणि हीच योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरणं. हा घटनाक्रम जर आपण बारकाईने पहिला तर मध्यप्रदेशच्या निवडणुकी दरम्यान पण हाच घटनाक्रम लागू झाला होता. त्यामुळे आता निवडणुकीनंतर हि मध्यप्रदेशसारखं राजकारण महाराष्ट्रात होताना दिसतंय.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आता केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम पाहत आहेत. मग असच काहीस एकनाथ शिंदेच्या बाबतीत देखील घडू शकत का? आता आम्ही असं का म्हणतोय असा देखील तुम्ही विचार करत असाल तर त्याचं हि उत्तर देतो.
२७ नोव्हेंबरला एकनाथ शिंदे यांनी अचानक प्रेस कॉन्फेरंस बोलावली आणि या प्रेस कॉन्फेरंस मध्ये त्यांनी अडीज वर्षात कशा प्रकारे महाराष्ट्राच्या हितासाठी काम केले, कशा प्रकारे ते कॉमन मॅन चे लाडके मुख्यमंत्री झाले, महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचे लाडके सख्ये भाऊ झाले या मुद्द्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सोबतच ते हे हि म्हणाले कि कालच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांचा महायुतीच्या केंद्रीय निर्णयांना पाठिंबा असल्याचे सांगितले सोबतच शिवसेनेचे पूर्ण समर्थन त्यांच्या निर्णयाला असेल हे हि त्यांनी या दरम्यान स्पष्ट केले. केंदीय मंत्राचे आभार हि व्यक्त केले. एकनाथ शिंदे हा रडणारा नाही तर लढणारा नेता आहे असं देखील ते म्हणाले. सोबतच उद्या म्हणजेच २८ नोव्हेंबरला दिल्लीत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होऊन मुख्यमंत्रीपदाची घोषणा होईल हे देखील त्यांनी प्रेस कॉन्फेरंस मध्ये स्पष्ट केले. परंतु संपूर्ण प्रेस कॉन्फेरंन्स मध्ये ते हेच बोलताना दिसले कि अडीज वर्षाच्या कार्यकाळाबद्दल मी समाधानी असून केंद्राच्या निर्णयाला माझे पूर्णपणे समर्थन असेल. पण आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट हि होती कि, प्रेस कॉन्फेरंस मध्ये एकदा हि एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे यांचे नाव घेतले नाही. एकीकडे शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या तर दुसरीकडे मी नाराज नाही असे विधान शिंदे यांनी प्रेस कॉन्फेरंस मध्ये स्पष्ट केले आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
ठाण्यामध्ये एकनाथ शिंद्यांची प्रेस कॉन्फेरंस संपल्या संपल्या लगेचच नागपुरातून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बनवकुळे यांनी देखील प्रेस कॉन्फेरंस घेतली. संपूर्ण प्रेस कॉन्फेरंसमध्ये त्यांनी फक्त एकनाथ शिंदेची जपमाळ जपल्याचे चित्र दिसून आले. सोबतच महायुती सरकारला महाराष्ट्रात भक्कम बनवण्यात एकनाथ शिंदेची खूप मोठी भूमिका असल्याचे आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर अभिमान असून महाराष्ट्रात ती भक्कमपणे मांडण्यात शिंदेचा मोठा वाटा असल्याचे देखील ते म्हणाले. सोबतच शिंदेनी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले तर महाविकास आघाडीने फक्त मुख्यमंत्री पदासाठी भूमिका मांडल्याचे ते म्हणाले. सोबतच ते हे हि म्हणाले कि जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा देखील शिंद्यानी खूप चांगले काम केले होते. शिंद्यांसारखा मजबूत मुख्यमंत्री ज्याने मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सामाजिक न्याय, सामाजिक समानता, आदिवासी वर्गासाठी काम केले आहे. महायुतीचा भक्कम चेहरा बनून त्यांनी महाराष्टात महायुती सरकारला घराघरात पोहचवले असल्याचे देखील ते म्हणाले. एकंदरीत बावनकुळेंच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पूर्णपणे एकनाथ शिंदेंचा कौतुक सोहळा पार पडला. पण यांच्याही प्रेस कॉन्फेरंस मध्ये आश्चर्यचकित करणारा मुद्दा हा होता कि अजित पवारांचा उल्लेख न होणे.
कुठेतरी अजित पवारांना महायुतीत वगळलं जातंय का? असा प्रश्न सध्या निर्माण होतोय…
महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय कि कोणत्या तरी सरकारने एवढ्या मोठ्याप्रमात विजय मिळवला आहे. परंतु या विजयावर देखील महाविकास आघाडी सोबत अपक्ष, मनसे आणि इतर पक्षांनी देखील शंका व्यक्त करत EVM चा घोटाळा केल्याचे आरोप महायुती सरकारवर केले आहेत. महायुतीचा झालेला विजय हा खरंच अविश्वसनीय जरी असला तरी संपूर्ण महाराष्ट्राने तो काबुल केल्याचे चित्र दिसून येतंय. पण एवढं क्लिअर चित्र असल्याचे जरी दिसत असले तरी कुठे ना कुठे महायुतीत नाराजी असून महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही अनक्लिअर आहे.
या अनक्लिअर सिच्युएशन मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा यावर तुमचं काय मत आहे ते कॉमेंट करून नक्की कळवा .








Comments
Post a Comment