चैत्यभूमीवर येणारा समुदाय....
थोर भारतीय पुढारी, अस्पृश्यांचे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन म्हणजेच महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर वर्षभरातच चैत्यभूमीची उभारणी झाली. बौद्ध संस्कृतीनूसार या स्थळावर चैत्यस्तूप उभारण्यात आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समुदायाला माणुसकीच जीवन दिलचं, परंतु त्याचबरोबर शिक्षणाची कास धरून आपली प्रगती साधण्याचा मूलमंत्र देखील दिला. अशा या थोर महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरासह देशभरातील लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले होते. लाखो भिमसैनिकांची गर्दी लोटली होती. बाबासाहेबांनी दिलेली मूलमंत्र गेली 60 वर्षे आंबेडकरी समुदाय प्राणपणाने जपतो आहे. आंबेडकरांनी दलित समाजातील लोकांना जागविले आणि जगविले.
या महामानवाच्या दर्शनासाठी राजस्थान, जयपूर, बडोदा, कोलकाता तसेच सांगली, सोलापूर, नागपूर, अहमदनगर, जळगाव, नाशिक यांसारख्या विविध भागांतून लोक आले होते. हे लोक 20-30 तास रांगेत उभे राहतात. 5 डिसेंबर पासून हि रांग सूरू होते. हि रांग चैत्यभूमीपासून सूरू होऊन वरळी नाक्यापर्यंत पोहचते. विविध भागांतून आलेल्या या लोकांच्या गर्दीच्या नियोजनासाठी मुंबई महानगरपालिका, पोलिस वर्ग तसेच वैद्यकीय यंत्रणेने कंबर कसली होती. शिवाजी पार्क मैदानामध्ये लोकांना राहण्यासाठी भव्य मंडप बांधण्यात आले होते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी 270 ठिकाणी व्यवस्था केली असून वैद्यकीय कक्ष, पोलिस नियंत्रण कक्ष, माहीती कक्ष आणि अग्नीक्षमण नियंत्रण कक्ष हे देखील उभारण्यात आले होते. वैद्यकीय सेवेसाठी 100 डाॅक्टरस् आणि 100 नर्स 5 डिसेंबर पासून तेथे उपस्थित होत्या. त्याचबरोबर महानगरपालिकेचे 200 अधिकारी आणि 6000 कर्मचारी कार्यरत असून 2000 हून अधिक पोलिस तैनात होते.त्याचबरोबर 45 CCTV कॅमेरांची देखील नजर संपूर्ण परिसरावर होती. दर्शनासाठी आलेल्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था तसेच शौचालय आणि स्थानगृहाची देखील व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने केली होती. मोठ्या संख्येने स्त्री वर्ग आणि वृद्ध वर्ग दर्शनासाठी उपस्थित असतो. त्यांच्या सुरक्षितेसाठी पोलिस वर्ग दिवस रात्र तिथे सज्ज असतो. त्यांना कोणताही त्रास होवू नये याची ते काळजी घेत असतात.
दादर रेल्वे स्थानकापासून थेट चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवाला मुक्त केला असून जागोजागी असणारा कचरा स्वच्छ करण्यासोबत कोणत्याही प्रकारचा कचरा होवू नये यासाठी पालिकेकडून सातत्याने आवाहन केले जात होते. केवळ आंबेरडकरांची साहित्यसंपदा, त्यांचे फोटो व त्यांच्या आयुष्यांतील काही अविस्मरणीय घटनांचा दस्तावज असलेल्या दिनदर्शिका, त्यांचे फोटो असणारे बिल्ले, गौतम बुद्धांच्या प्रतिकृती, चित्रांचा कलात्मक खजिना गावागावांहून आलेल्या या अनुयायांनी विक्रीसाठी आणला होता. आत मुख्य मैदानामध्ये राज्याच्या विविध ठिकाणांहून आलेल्या प्रकाशकांनी स्टाॅल्स लावले होते. तिथेच धम्मध्वज विक्रेत्यांचा हि एक स्टाॅल होता. त्यांनी त्या ध्वजाचे महत्व सांगितले. या झेंड्याला पंचशिल झेंडा असे संबोधले जाते. यात 5 रंग असतात जे त्वचा, आकाश, चेहरा, शांतता आणि मैत्री अशा बौद्धांनी सांगितलेल्या गोष्टींचे प्रतीक आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पंचशील झेंडा मानला जातो असे त्यांनी सांगितले. तसेच या दिवशी शोक म्हणून पांढरे कपडे परिधान केले जातात असेही त्यांनी सांगितले. त्याच परिसरात "अखिल भारतीय विद्यार्थी परिषद" संस्थेचाही स्टाॅल लावला होता. हि संस्था 1950 पासून कार्यरत आहे. ही संस्था विद्यार्थ्यांना येणार्या समस्या तसेच त्यांचा विकास कसा होईल यासाठी काम करते. हि संस्था दरवर्षी शिवाजी पार्क परिसरात 6 डिसेंबर रोजी स्टाॅल लावते. त्यामाध्यमातून आंबेडकरी जनतेचे प्रबोधन कसे होईल यासाठी पुस्तक वाटप, पत्रके वाटप तसेच येणार्या जाणार्या लोकांना चहा-पाणी वाटप करण्याचे काम करते. त्यांनी आरक्षणाबद्दल "आर्थिकदृष्ट्या आरक्षण नसावच तर सामाजिकदृष्ट्या पिछाडलेल्यांना आरक्षण असावं" असे मत व्यक्त केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अत्यंत योग्य आणि सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाचं महत्व आज प्रत्येक आंबेडकरी माणूस जाणून आहे. त्याचचं पुढचं पाऊल म्हणजे "एक वही, एक पेन". गेल्या वर्षी 6 डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमीवर येणार्या भीम अनुयायांना फेसबुक आंबेडकरराईट मुव्हमेंट (फ्याम) च्या वतीने एक आगळे वेगळे आवाहन करण्यात आले होते. यंदाही हे अभियान राबविण्यात आले. महामानवाला अभिवादन करण्यासाठी येताना हार, फुले, मेणबत्ती न आणता एक वही, एक पेन आणावे असे हे आवाहन आहे. जमा झालेले वही आणि पेन दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांच्या मुलांना तसेच दुर्गम आदीवासी भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येते. अशी संपूर्ण माहीती अभियानाचे संयोजक सुशीम कांबळे आणि सुधीर भालेराव यांनी दिली.
संपूर्ण बोद्ध अनुयायांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे हेही या थोर महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील बाबासाहेबांना ट्वीट्ररवरून श्रद्धांजली वाहिली. 'बाबासाहेबांच्या कार्यासाठी देश सदैव त्यांचा ऋणी आहे.' असे मोदींनी म्हटले आहे.
गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणार्या तसेच संपूर्ण पीडीत दलित समाजाला सन्मानाने उभे राहून कार्य करायला सांगणार्या तसेच देशाचे संविधान लिहीणार्या या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या या जनतेचे स्वतःच्या धर्माबद्दल, गौतम बुद्धांबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेला आदर त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. गेल्या 60 वर्षांपासून लोक दादर मधील चैत्यभूमीवर दर्शनासाठी येतात पण त्यांना कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही तसेच त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ते आभार व्यक्त करत होते. अत्यंत निस्वार्थी मनाने लोक या महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतात.

nice sau
ReplyDelete