स्त्री....

                          स्त्री...... 

             आजच्या काळातील स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. तरीही तिला घरच्या जबाबदारीतून मुक्त होता येत नाही. तिची जबाबदारी अधिक वाढते. तिच्या जीवनाला एक वेगळे वळण मिळते. घरी लहान मुलांना सांभाळायचं तर ऑफीसमध्ये हाताखालील कर्मचार्यांना; घरी जेष्ठांचा मान राखायचा तर ऑफीसमध्ये बॉसचा.... मनात खूप इच्छा असते उंच भरारी घेण्याची पण घरच्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून ती आपल्या इच्छा तितेच दफन करते. लग्न झाल्यावर अनोळखी घरात जावून सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी झटत असते. लग्नाआधी आईवडिलांचा मान राखायचा लग्नानंतर सासू-सासऱ्यांचा; लग्नाआधी जीन्स घालणारी लग्नानंतर साडी घालायला लागते; स्वतःसाठी जेवण बनवायला कंटाळणारी मुलगी सकाळी लवकर ऊठून सगळ्यांना डबे बनवून देते. लग्न झाल्यावर सासू-सासरे म्हणजे आईवडील; नणंद म्हणजे मोठी बहिण; दीर म्हणजे भाऊ...  प्रत्येकाला आपल्यात अनुरूप करून घेते. प्रत्येक मुलीला स्वप्नातला राजकुमार त्याचा राजवाडा मिळतोच असे नाही तरीसुद्धा ती आपल्या झोपड्यासारख्या घराला राजमहाल बनवते. ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंद निर्माण करते.  जर मुलगा हा वंशाचा दिवा आहे तर मुलगी हि वंशाची पणती का नाही???? दिवा आणि पणती दोघेही उजेड सारखाच देतात. त्यात फरक आपण निर्माण करतो....... 
                    आपण नेहमी आशिर्वाद देताना "अष्टपुत्र सौभाग्यवती भव " असा देतो, त्या ऐवजी "अष्टपुत्री सौभाग्यवती भव" असा का देत नाही????  आपल्याला आई हवी.. ताई हवी... बायको पण हवी.... पण मुलगी नको..... मुलगी परक्याच धन असते अस नेहमी आपण म्हणतो पण ती सासरी गेल्यावर तिला माहेरच्या आठवणी पुसून टाकता येत नाहीत. कितीही मोठ्या संकटात खंबीरपणे उभी राहते. एरवी ती गरीब गाय असते पण वेळ आल्यावर मात्र कालीमातेचे रोद्र रूप ती धारण करते. अश्या मुलीला आपण जगात  येण्याआधीच मारून टाकतो.  प्रत्येक जण विचारत मुलगा झाला कि मुलगी पण फक्त आई विचारते माझ बाळ कसं आहे??? मुलगा हवा म्हणून देवीकडे नवस करायला जाता पण हे का विसरता कि ती देखील एक स्त्रीच आहे... कोणत्याही स्त्री वर पुरुषाची वाईट नजर सहज जाते. मग तिने पूर्ण कपडे घालू देत अथवा अर्धवट... दोष तिच्या कपड्यात नाही तुमच्या नजरेत आहे. आपल्याला तिजोरीतील लक्ष्मी हवी असते पण स्त्रिच्या पोटात वाढणारी लक्ष्मी नको असते. मुलगा असो व मुलगी दोघांनाही समान वागणूक दयायला शिका..... "विचार आणि दृष्टी बदला, देश आपोआप बदलेल..... "

Comments

  1. खूप छान...चांगले विचार आहेत तुझे. पण समाजाला हे कोण समजावणार..???

    ReplyDelete
    Replies
    1. हो..... ते पण आहेच....

      Delete
    2. हर्ष जर तुला चांगले विचार वाटतात तर पहिल्यांदा स्वतः पासून सुरुवात करावी. मग आपणच पुढाकार घेऊन समाजाला समजवायचे.

      Delete
  2. सायली खूप छान लिहिले आहेस. फक्त आता मुलही हातभार लावतात. थोडासा trend बदलला आहे. बाकी मस्त

    ReplyDelete
  3. Very nice thought...this should be implements in our society...but still now many of peoples are not aware about this...

    ReplyDelete
  4. Very nice thought...everyone should think of it...very nice sayali...keep it up...

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. सायली खूप सुंदर लिहिले आहेस तुझे लिहिणे हे कौतुकास्पद आहे जग बदलत आहे लोकांची हि विचारसरणी बदलेल खूप सुंदर

    ReplyDelete
  7. सायली खूप सुंदर लिहिले आहेस तुझे लिहिणे हे कौतुकास्पद आहे जग बदलत आहे लोकांची हि विचारसरणी बदलेल खूप सुंदर

    ReplyDelete

Post a Comment