“No Mean’s No” असतं…..

 “No Mean’s No” असतं…..

आपल्या समाजात मुलगी “No, नाही” म्हणतेय म्हणजे कदाचित त्या “नाही” मागे “हो” हे उत्तर आहे असचं समजलं जातं आणि त्या मुलीच्या मनाविरुद्ध वागून तिला होणारा त्रास समजून न घेता तिच्या मनाची हत्या केली जाते. मुलगी किंवा स्री हि एका प्रोपर्टी प्रमाणे असल्यासारखी समजून त्यावर मालकी हक्क गाजवणारा प्रत्येक मनुष्य हा आरोपी आहे, हत्यारा आहे. सेल्फ रिस्पेक्ट गमवण्याच्या आणि समाजात स्वतःची इज्जत घालवण्याच्या भितीमूळे प्रेमात असलेला माणूस राक्षस होतो. 

“No means No” असतं हे काही लोकांना कळतचं नाही फक्त स्वतःचा हट्ट आणि पावर दाखवण्यासाठी मनुष्य कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो हे एका वायरल झालेल्या हिडीओ मधून दिसून येतं.

संपूर्ण सोशल मिडीयावर आणि न्यूज चॅनल वर सतत एक व्हिडीओ प्ले होताना दिसत आहे. तो व्हिडीओ इतका भयानक होता की कोणत्या हि मुलीच्या मनात आपल्या जोडादाराबद्दल भय-भीती निर्माण होईल. तो व्हिडिओ होता दिल्लीतल्या साक्षी हत्याकांडचा…

दिल्लीतील शाहबाद डेअरी या भागात राहणारी साक्षी वय वर्ष १६ आणि साहिल खान वय वर्ष २० हे दोघे हि रिलेशनशिपमध्ये होते. साहिल आणि साक्षी हे दोघे हि एका सर्वसामान्य परिवारातील आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणास्त्व वाद झाले आणि साक्षीने साहिल सोबत ब्रेकअप केले. साक्षीने स्पष्ट सांगितले होते कि तिला आता त्याच्यासोबत रहायचे नाही तरी सुद्धा असमाधानी साहिल हा तिचा पाठलाग करायचा. साक्षी रविवारी रात्री तिच्या मैत्रिणीकडे बर्थ डे पार्टीसाठी जात असताना साहिलने तिला भर रस्त्यात अडवून वादावादी करत तिच्यावर अमानुषरित्या चाकूने २१ वेळा हल्ला केला सोबतच डोक्यात ६ वेळा मोठा दगड घातला आणि लाथाबुक्क्या मारत तिची हत्या केली. हे सर्व कृत्य होताना आजूबाजूला अनेक नागरिक फक्त बघ्याची भूमिका साकारत होते कोणीही साक्षीला वाचवण्यासाठी किंवा साहिलला अडवण्यासाठी पुढे आले नाही. हे सर्व कृत्य सीसीटिव्ही फुटेज मध्ये रेकॅार्ड झाले आणि ते सर्वत्र वायरल झाले. या घटनेनंतर साहिल त्याच्या आत्याच्या घरी लपून बसला होता. त्याने त्याचा मोबाईल हि बंद करून ठेवलेला परंतू पोलिसांनी त्याच्या आत्याचा मोबाईल स्ट्रेस करून त्याचा पत्ता शोधून काढला आणि त्याला पकडले, परंतू साक्षीचा मात्र जीव गेला….

या भयानक कृत्यातून हेच दिसून येते की जर मुलगी “नाहि” म्हणाली तर तो स्वतःचा अपमान समजून मुलं स्वतःची पावर आणि इगो दाखवण्यासाठी मुलींची हत्या करणार आणि त्या कृत्याला ‘प्रेम’ असं नावं देणार… 

प्रेम करता तर समोरच्या व्यक्तीची तिच्या निर्णयांची इज्जत करायला शिका ना की तुम्हांला तिचे निर्णय पटत नाहीत म्हणून तिला त्रास द्या, तिला बेईज्जत करा किंवा तिची हत्या करा…. प्रेमात एकमेकांना समजून घेऊन समोरच्या व्यक्तीशी पटवून घेऊन रहायला नाही जमत आहे तर बोलून भेटून विषय मिटवायचा प्रयत्न करा आणि त्यातूनही विषय नसेल मिटत तर समोरच्याला त्याचं आयुष्य आनंदाने जगू द्यात आणि तुम्ही ही तुमचं आयुष्य आनंदाने जगा…. 


आपण आपल्याच आजूबाजूला असे अनेक जोडपी बघतो जे जबरदस्ती एकमेकांसोबत मनाविरुद्ध राहत असतात का तर समाजाच्या भीतीने की समाज काय बोलेल लोक काय बोलतील या भीतीने स्वतःचं मन मारुन एकमेकांसोबत राहत असतात. आपण आपलं आयुष्य “लोक” या दोन शब्दांच्या भोवती बांधून न ठेवता आपल्याला जे हवंय तसं वागलं पाहिजे एवढा फ्रिडम तर असावा स्वतःला. पण याचा अर्थ हा नाही होत की तुमच्या फ्रिडमचा वापर करुन तुम्ही कोणाचं तरी आयुष्य खराब कराल किंवा आयुष्य संपवून टाकाल आणि त्याला ‘प्रेम’ असं नाव द्याल. जे वागाल कराल त्याचा थोडा विचार करून वागा आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होऊन देऊ नका. एखाद्याला इमोशनल ब्लॅकमेल करून स्वतः जवळ ठेवण्याची चूक नका करू. समोरच्या व्यक्तीच्या निर्णयांची, प्रेमाची रिस्पेक्ट करा, Restrictions लावू नका समोरच्या व्यक्तीला ही त्याचं आयुष्य त्याच्या परिने जगू द्यात.

आज त्या साक्षीचा जीव गेला. तिला न्याय मिळेल हि कदाचित. पण कधी जेव्हा तिच्यासारख्या अनेक साक्षींची बळी जाईल तेव्हा. हे कुठे तरी थांबलं पाहिजे आणि याची सुरुवात स्वतःपासून करा….

॥विचार बदला जग बदलेलं॥


#betibacchao #sakshihattyakand #delhicrime #needtochange #thoughtprocess #sakshi #sahilkhan #delhipolice #crime #socialmedia #viralvideo #delhicases #sakshimurdercase #wewantjustice #justiceforsakshi #badmentality #humanbeing #lovejihad #delhimurdercase #maharashtra #manpower #womenvoilence #100 #policehelplihe103#policehelpline #love #relationships #murders #trendings

Comments