♥प्रेम हे......♥

                               ♥प्रेम हे......♥
  

         जसजसं आपण वयात येतो तसतसं आपल्या मनात कुणाबद्दल तरी आकर्षण निर्माण व्हायला लागतं. कुणी तरी आवडू लागतं, कुणी तरी भेटावं असं वाटायला लागतं. कुणाची तरी स्वप्नं पडायला लागतात.... ह्यालाच कदाचित "प्रेम" असं म्हणतात.  प्रेम ह्या शब्दात एक निर्मळ नातं जुळलेलं असतं.  प्रेमाला अनेक उपमा दिल्या जातात. लोक म्हणतात कि  प्रेम असावं तर लैला-मजनु सारखं कोणत्याही संकटात साथ न सोडणारं. प्रेम असावं तर गोठ्यातल्या गाईसारख घरातल्या आई सारख किती ही चुका केल्या तरी त्या मायेच्या पदरात घेऊन जवळ करणार. प्रेमात विश्वास असावा , समजूतदारपणा असावा. प्रेमाचे बंध हे आयुष्यभरासाठी असतात जे नेहमी प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात, मागे खेचत नाहीत.
                   प्रेमाचे वेगवेगळे प्रकार आहेत.... हो वेगवेगळे प्रकारचं म्हणता येतील. आई-मुलांमधलं प्रेम, प्रियकर-प्रेयसी मधलं प्रेम, मैत्री मधलं प्रेम, प्राणिमात्रांमधील प्रेम, बालिश प्रेम, वयात आलेल प्रेम... असे खूप प्रकार पडतात. बालिश प्रेम म्हणत मला तुझी गरज आहे म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो आणि वयात आलेल प्रेम म्हणतं की मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे. प्रेम ही अशी गोष्ट किंवा भावना आहे जी ठरवून होत नाही. ठरवून हा नेहमी "TimePass" होतो "प्रेम" नाही.
       
       
           प्रेम कसं होतं किंवा झालयं हे कसं कळतं???? एखाद्याला आपण आवडतो हे त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून समजते. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये कसं जर प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीने केल जायचं. म्हणजे चिठ्ठी लिहून, कविता करून. परंतू आताच्या काळात प्रेम व्यक्त करताना कसलाच विचार न करता अगदी सोप्या रीतीने प्रेम व्यक्त करतात. "I Love You"  हे तीन  Magical Words सध्याच्या पिढीमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे शब्द आहेत.  परंतू खरचं हे तीन Magical Words बोलून प्रेम किंवा तिच्या किंवा त्याच्या बद्दल वाटणाऱ्या मनातील भावना व्यक्त होत असतील?????
     

        प्रेमामध्ये प्रियकर-प्रेयसीशी चोरून बोलणं, चोरून भेटणं, तिचा किंवा त्याचा स्पर्श होणं ह्या गोष्टी सुखावणाऱ्या असतात. आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला भेटण्यासाठीची ओढ, विरह, अस्वस्थता हे प्रेमामध्ये होत असतं. परंतू आताच्या पिढीमध्ये ह्या भावना किंवा ती ओढ लोप पावत चाललेली दिसून येते.  प्रेम म्हणजे आताच्या पिढीसाठी हा फक्त आणि फक्त "TimePass" झाला आहे. म्हणजे ज्या मुलांना प्रेमाचा अर्थ हि माहीत नसतो ती मुलं हातात हात घालून गळ्यात गळे घालून बीच वर बसलेले दिसतात. खरचं हसू येत अशा मुलांवर. ज्यांना प्रेमाचा अर्थ हि समजत नाही ती मुलं 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' असं म्हणून मोकळे होतात. बर प्रेम व्यक्त कराव पण किती जणांवर. एक नाही म्हणाली तर दुसरी दुसरी नाही म्हणाली तर तिसरी हि आकडेवारी सतत चालूच असते. ह्यांच्या बद्दल बोलाव म्हटलं तर 'तू हि रे माझा मितवा' असं म्हणण्या एेवजी 'तु हि रे माझा कितवा' असं म्हणाव लागेल.  प्रेम अनुभवणारे किंवा ते खरचं करणारे आजच्या युगात खूप कमी लोक आहेत.
   
     
        प्रेम हे कॉफीप्रमाणे असते ज्यात सर्व समान असले पाहीजे. म्हणजे जर कॉफी जास्त झाली तर ती कडू होते आणि साखर जास्त झाली तर ती गोड होऊ शकते. म्हणून प्रेमात ही समानता असली पाहीजे. प्रेम हे रबर प्रमाणे असते. त्याला जास्त ताणलं कि ते तुटते. प्रेमामध्ये हि असचं नात तुटण्याची भीती असते. त्यामुळे जर एकाची चूक असेल तर दुसऱ्याने तटस्थ न राहता मोठ्या मनाने ती चूक पोटात घेऊन पुन्हा हे प्रेमाचे नाते पुढे न्यावे. तुमच्या आयुष्यात कोणी कधी यावे हे तुमच्या कपाळावरील रेषा ठरवतात. पण ते तुमच्या आयुष्यात तुमच्या ह्रदयात टिकून रहावे यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. तसेच प्रेमाचे ही असते. प्रेमकथा ह्या फक्त वाचायच्या नसतात त्या अनुभवायच्या ही असतात आणि फक्त प्रेमकथा महत्वाच्या नसतात महत्वाची असते ती तुमची प्रेम करण्याची क्षमता.


      एक गोष्ट आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा की, "एखाद्यावर प्रेम करणं खुप सोप्प असत, पण तेच प्रेम शेवट पर्यंत निभवणं हे तितकचं कठिण असतं."....
 

   
                                                 - सायली चाळके..

Tags:- 

#Love# #oneSideLove# #Girlfriend# #Boyfriend# #TrueLove# #Childlove# #crush# #trust# #Timepass# #iloveyou# #movies#

Comments

  1. शेवट खूप छान केला.

    ReplyDelete
  2. दोन व्यक्ती जेंव्हा प्रेमात असतात तेंव्हा त्यात फक्त त्या दोघांचा नाही तर इतर अनेक व्यक्तींचा आणि घटकांचा समावेश असतो.त्यामुळे बरचं काही घडतं किंवा बोललं जातं.
    पण तुम्ही शेवटी बोललात तेच 'शाश्वत'
    ♥♥♥

    ReplyDelete
  3. एकदम भारी लिहिलय

    ReplyDelete

Post a Comment