♥मन उधाण वा-याचे😅

♥मन उधाण वा-याचे😅

मन....♥

       सर्वांना माहीत आहे आपलं मन हे कधीच स्थिर नसतं ते चंचल विचारांनी इकडून तिकडे वावरत असतं.  मन हे वार्याप्रमाणे असतं. जे इकडून तिकडे वेगवेगळे विचार घेऊन वाहत असतं. जे एका ठिकाणी कधीच स्थिर राहत नाही. नेहमी वाहत असते. असचं काहीस माझ मन आहे. जे एका प्रसंगात चंचल झालं आणि फुलपाखराप्रमाणे फक्त त्या प्रसंगाचा आस्वाद घेऊन उडून गेले.

        तापत्या उन्हात वार्याची एक झुळुक येते आणि आपण निसर्गाच्या प्रेमात पडतो, तसचं काहीसं झालं त्या दिवशी. काहीचं समजत नव्हतं. माझं मन वेगळ्याचं विश्वात रमून गेलं. इथून- तिथून सतत येरझार्या मारत होतं. काय झालेलं माझ्या मनाला??? खूप काही झालं होत कदाचित.. मी अशा एका व्यक्तीच्या प्रेमात पडली होती की ज्या व्यक्तीचा विचार मी ह्या आधी कधीच केला नव्हता. त्याचा चेहरा, त्याच हास्य, त्याच वागणं, त्याचा रूबाब सगळ कसं अगदी डोळ्यासमोर येत होत. काहीच समजत नव्हत मला. पण दिवसाचे २४ तास त्याचा विचार काही माझा पाठलाग सोडत नव्हता. मन सतत त्याच्या विचारात गुरफटत होतं. त्याचा नुसता चेहरा डोळ्यासमोर आल्याने माझ्या चेहर्यावर स्मित हास्य फुटतं होतं. असं का होताय? ह्याच उत्तर देण्यासाठी माझं मन सुद्धा असमर्थ झालेलं.... मी मनात खोल डोकावून पाहिलं आणि स्वत:च्याचं मनाला प्रश्न विचारला हे प्रेम आहे की निव्वळ आकर्षण ???? पण जे काही आहे त्यात खरचं खूप आनंद मिळत होता.

          खूप दिवस हे विचारांच वादळ मनात फिरत होत. मनात विचारांचं वादळ, डोक्यात सतत त्याचे विचार आणि डोळ्यासमोर त्याची प्रतिमा हे चक्र सुरूच होतं. कोण आहे तो?  माझं मन त्याला जाणून घेण्यासाठी इतक आतुर का झालंय? मी प्रेमात तर पडले नाही ना..... कदाचित हाच असावा का तो माझ्या स्वप्नातील राजकुमार??? त्याचं हास्य, त्याचा रूबाब, त्याचा डौल सर्व काही मिळत-जुळतं..... पण शेवटी मन , क्षणिक आनंद देऊन जात ते. हे सर्व विचार मनात चालू असतानाच माझं मन जुन्या आठवणींपाशी येऊन थबकलं.... पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या. मनात विचारांचं काहूर उठले. हा सुद्धा तसाचं निघाला तर..... ह्या विचारानेचं माझ मन घाबरून गेलं.

     
     
         कसं असतं आपलं मन.... चंचल.. कधी हि एका गोष्टी साठी ठाम नसतं. असे काही प्रसंग क्षणीक आनंद देऊन जातात. पण खरच हे प्रसंग कधी कधी आठवले की हसू हि सुटतं आणि कधी कधी भीती हि वाटते की असा स्वप्नातील राजकुमार मिळाला नाही आणि दुसराचं ह्याच्या उलट स्वभावाचा मिळाला तर.....त्या पेक्षा हे स्वप्न ही नको आणि विचार ही...

     अस हे चंचल मन, चंचल स्वभाव आणि चंचल विचार प्रत्येकाच्या मनात चालू असतात पण काही त्यातून बाहेर पडतात तर काही माझ्या सारखे त्यातच गुंतून राहतात....😅
       
       😊रुणझूणते गुणगुणते कधी गुंतते हरवते, कधी गही-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते , कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते,  भाबडे तरी भासांच्या मागुनी पळते....

♥मन उधाण वा-याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते.♥


Tags:-

#Heart# #TrueLove# #OneSideLove# #Scars# #Happiness# #butterfly#

Comments

Post a Comment