❤मितवा😘

❤मितवा😘
एक मुलगा आणि एक मुलगी फक्त मित्रमैत्रिण आहेत.....😯😯 असं ऐकल की लोक असे रिऐक्शन देतात की खूप मोठ आश्चर्यचकित करणार वाक्य ऐकलं.... खरचं अशा लोकांवर मला खूप हसू येत...😂😂 का नाही असू शकत दोन वेगळ्या लिंगाचे व्यक्ती एकमेकांचे फक्त मित्रमैत्रिण..... माझ्यात आणि त्याचात तर असंच काहीसं नातं आहे...लोकांना ते नाही पटतं पण आम्हांला पूरेपूर पटतं.... ते एक वाक्य आहे ना की "आमची मैत्री समजायला वेळ लागेल आणि जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल..." हे वाक्य आमच्या मैत्रीला साजेस आहे... आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की "तो" असं म्हणार्या व्यक्तीचं नावं आहे तरी काय??? आहे एक मुलगा..... खूप चांगला. मला माझ्यापेक्षा ही जास्त ओळखणारा. माझ्या प्रत्येक क्षणात माझ्यासोबत असणारा. स्वत:चं दु:ख लपवून दुसर्यांच्या चेहर्यावर हसू आणणारा. सर्व मित्रांची जान, शान आणि मान असणारा. सर्व मुलींचा शाहरूख😎 आणि काहींचा स्वप्निल😘 ही. थोडसा 😡रागीट पण 😘खूप प्रेमळ.. त्याच्या डोक्यात काय चालू आहे किंवा काय चालायं हे कधीच कोणी ओळखू शकत नाही. कोणते ही तर्क लावताना सर्व गोष्टींचा पूरेपूर योग्य असा विचार करतो की ती गोष्ट योग्य ठरली की त्याचं एकचं वाक्य नेहमी ठरलेलं असतं "बघ मी बोलेलो ना.. सायली तुला माहीत आहे ना माझं नाव काय आहे" हा त्याचा Attitude म्हणता येणार नाही तर ती गोष्ट योग्य ठरली ह्याचा आनंद त्याच्या बोलण्यातून जाणवून येतो.  हा असा माझा खूप जवळचा मित्र.... मैत्रीच्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे असणार असं हे नातं....

        त्याची अाणि माझी ओळख ही Formal भाषेमध्ये सांगायला झालं तर खूप जूनी अाहे.. Formal ह्यासाठी म्हणाली की तो माझ्या काँलनी मध्येच रहायचा म्हणून.... नंतर Coinsidence म्हणजे आम्ही काँलेज मध्ये एकाचं वर्गात... तेव्हा पासून आमच्यात ओळख सूरू झाली. नंतर आम्ही एवढे चांगले Friends झालो की कधी विचार ही केला नव्हता की आम्ही कधी असे असू... 12 वी नंतर मी काँलेज बदलं. नंतर आमच्यात काही गोष्टींमूळे Miss Understanding ही झाली. पूर्ण 1 वर्ष एकमेकांशी बोलतं नव्हतो. अर्थातचं त्या न बोलण्यामागेही त्याचा चांगला उद्देशचं होता. मैत्रीचं नातं खर आणि निस्वार्थ असेल ना तर ते आयुष्यभर टिकून राहत हे खरचं आहे. असचं नातं आमच्यात असल्याने ते Miss Understanding दूर झालं आणि पुन्हा आम्ही एकत्र आलो.

         आमच्यातलं हे मैत्रीचं नातं आता इतक अतुट झालायं की मी न बोलता ही सर्व काही समजून जातं त्याला. जी गोष्ट मला लोकांना पटवून द्यावी लागते ती त्याला न सांगताचं समजली म्हणूनचं तो माझा खूप चांगला मित्र आहे. आणि हो फक्त मित्रचं. हे ह्यासाठी म्हणाली की जर दोघांच्या ही मनात निर्मळ मैत्री असेल तर लोक ती नाहीचं असं समजतात. आमच्या ह्या नात्यात कधीचं बंधन नाही आली कारण मैत्री ही बंधनांची नसतेचं. लोक आमच्या बद्दल खूप काही बोलतात "अरे हे दोघ नेहमी एकत्र असतात तर नक्कीच ह्यांचात काही तरी आहे" असाचं गैरसमज लोक नेहमी करून घेतात. कधी कधी खरचं विचारात पाडतात लोकांचे वाक्य... लोक हा विचार का नाही करत की कदाचित त्याला किंवा तिला त्याची किंवा तिची  Company आवडतं असेलं.  त्या दोघांमध्ये काही तरी आहे ह्या पेक्षा खूप चांगली मैत्री आहे असा विचार कधीचं कोणी करत नाही.. असा विचार जर सगळे करायला लागले तर खरचं एक मुलगा आणि एक मुलगी फक्त मित्रमैत्रिण असू शकतात हे सिद्ध होईल.
     

        मैत्री हे वेळे बरोबर मन आणि मनाबरोबर माणसं जशी बदलतात तसं बदलणार नातं नसून वेळ आणि मन जोडणारं असं हे नातं असतं. मैत्री हे नातं संशयाचं नसून ते एक विश्वासाचं नात आहे.

मैत्री म्हणजे नाव असतं स्वत:त गजबजलेलं गावं असतं,
म्हणजे स्वच्छ काया जी मित्रावर करते आईप्रमाणे माया,
मैत्री म्हणजे असते एक जागा त्यात गुंतलेला असतो मैत्रीचा धागा.

         हे असं असतं मैत्रीचं नातं जे खूप कमी लोकांना समजतं. मला एवढचं सांगायचंय की जर दोघांच्या ही मनात मैत्री खेरीज दुसर काहीही नसून निस्वार्थी आणि विश्वासू अशी मैत्रीची भावना असेल तर नक्कीच एक मुलगा आणि एक मुलगी फक्त मित्रमैत्रिण असू शकतात.....



Tags:- 
#Friends# #Girlfriend# #Boyfriend# #True# #Friendship# #Forever# #mitwa# #Films# #FriendshipStories# #closeFrnds# #TogetherForever# #TrueFrnds#

Comments

  1. निर्मळ मनाने निर्मळ नात्याविषयी लिहलं आहेस👌👌

    ReplyDelete
  2. भारी, मस्त आणि खरं सत्य समोर आणणारा विषय।��
    खूप मस्त लिहिलंस साऊ। असच भारी लिहत जा ह्याच शुभेच्छा।��
    आणि ह्या विषयाच्या उलट विचार करणाऱ्यांचा विषय च वेगळा आहे inshort cheap mentality..so keep it on..��

    ReplyDelete
  3. खरंच मस्त लिहिलंआहेस सायली👏😇

    ReplyDelete
  4. ज्या लोकांना असं वाटतं की 'स्त्री' आणि 'पुरुष' इतकचं नातं असतं त्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे.
    माणूस भावना असल्यानेच जनावरांपेक्षा वेगळा आहे,फक्त मेंदूने नाही.
    छान व्यक्त झालात.👍👍👍

    ReplyDelete

Post a Comment