आयुष्य.........



आयुष्य.........  

                                                   
                                                            आयुष्य म्हणजे नेमक काय?
         वळवाव तस वळत जाते..... घडवाव तस घडत जाते.... सुख आणि दु;खाचे क्षण येऊनच आयुष्य उलघडत जाते ... अळीला ज्याप्रमाणे पंख फुटून त्याचे रंगीबेरंगी फुलपाखरू बनते त्याचप्रमाणे आयुष्यातील सुख आणि दुःखाच्या क्षणांचा मेळ होऊन आयुष्य घडून येते. आयुष्याची व्याख्या तरी नेमकी कशी करावी ? आयुष्य  हे गरम कॉफीप्रमाणे असते ,वेळीच त्याची चव घेयला हवी ,नाहीतर ते बेचव बनते.  आयुष्य  हे पाण्यातल्या नावेप्रमाणे असते. नावेला दिशा दर्शवण्यासाठी ज्याप्रमाणे नावाड्याची आवश्यकता असते, त्याप्रमाणे आयुष्यात योग्य दिशा दर्शवण्यासाठी मार्गदर्शकाची गरज असते.  आयुष्यातील सुख म्हणजे वाऱ्याची मंद झुळूक.... आणि दु;ख म्हणजे वादळ. या वादळाचा सामना आपण कश्याप्रकारे करतो व सुखाच्या झुळ्केचा आस्वाद घेताना त्यात हरवून तर जात नाही ना??? आयुष्याचा मिठाईप्रमाणे वेळीच आस्वाद घेता आला पाहिजे नाहीतर त्याला मुंग्या चिकटतात असेच काहीसे आयुष्याचे असते... आयुष्य हे एखाद्या चित्राप्रमाणे असते. चित्र ज्याप्रमाणे रंगवून उठावदार करता येते तसेच आयुष्यसुद्धा अनेक सुखद क्षणांनी बहरून जाते.
               आयुष्य म्हणजे जणू अथांग समुद्रच. समुद्र जसा प्रत्येकाला काहीना काहीतरी देत असतो. काही जण  त्यातून शंख शिंपले उचलतात. तर काहीजण लाटेसोबत अलगुज करतात. तर काहीजण नुसतेच पाय ओले करतात. आयुष्याचसुद्धा असाच काहीस असत. ते प्रत्येकाला सारखाच देत असत, आपण त्यातून काय घेतो हे महत्वाच.....  आयुष्य जगण्याची एक वेगळीच मजा असते. ती मजा माणसाला घेता आली पाहिजे. आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त ते जगता आले पाहिजे. त्याची योग्य ती मजा घेता आली पाहिजे.... आयुष्य हे बुद्धीबालासारखे असते तिथे नेहमीच आपल्याला पुठे चाल करता येत नाही कधी परिस्थिती पाहून दोन पावले मागे हि टाकावी लागतात.
            आयुष्यावर जितके बोलू तितके कमीच आहे......... 

Comments

Post a Comment